Ad will apear here
Next
... आणि स्वित्झर्लंडच्या पर्वतावर झळकला भव्य भारतीय तिरंगा


स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न हा ४४७८ मीटर उंचीचा पर्वत १८ एप्रिल २०२० रोजी भारतीय तिरंग्याने झळाळून उठला होता. करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या जागतिक साथीशी लढताना आपण सारे एक आहोत, असा संदेश देण्यासाठी तेथे सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी हा पर्वत भारतीय तिरंग्याने उजळवण्यात आला. 

आल्प्स पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न हा ४४७८ उंचीचा पर्वत असून, तो स्वित्झर्लंड आणि इटलीच्या मध्ये झरमॅट या गावात वसलेला आहे. करोनाच्या महाभयंकर साथीशी लढणाऱ्या साऱ्या देशांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी, एकीची भावना दृढ करण्यासाठी या पर्वतावर एकेका देशाचा झेंडा प्रकाशाद्वारे झळकवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. १८ एप्रिलला भारतीय तिरंग्याचे एक हजार मीटरहून अधिक लांबीचे चित्र प्रकाशाद्वारे या पर्वतावर झळकवण्यात आले. स्वित्झर्लंडमधील लाइट आर्टिस्ट (प्रकाश कलाकार) गेरी हॉफस्टेटर हा उपक्रम राबवत आहेत.

‘जगातील मोठी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असलेला भारत देश करोना विषाणूशी दोन हात करत आहे. अशा मोठ्या देशांतील आव्हानेही खूप मोठी आहेत. सगळ्या भारतीयांप्रति असलेली आमची सद्भावना आणि एकीची भावना व्यक्त करण्यासाठी मॅटरहॉर्न पर्वतावर तिरंगा झळकवण्यात आला आहे,’ असे झरमॅट मॅटरहॉर्न या पर्यटन संस्थेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

स्वित्झर्लंडमधील भारतीय दूतावासाने या घटनेचे ट्विट केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते रिट्विट केले आहे. ‘जग या महामारीचा सामना एकत्रितपणे करत आहे आणि मानवता या महामारीवर नक्की मात करील,’ असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

करोना विषाणूमुळे जगभर नकारात्मक वातावरण असताना त्यात सकारात्मकतेची आशा जागवण्यासाठी स्वित्झर्लंडकडून मार्चच्या अखेरीपासून हा उपक्रम राबविला जात आहे. मॅटरहॉर्न पर्वत हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून, सर्वांत जास्त फोटो टिपले जाणारा पर्वत अशी त्याची ओळख आहे. आतापर्यंत या उपक्रमात अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन आणि स्पेन या देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत. तीन एप्रिल रोजी या पर्वतावर ‘स्टे होम’ हा संदेश प्रसारित करण्यात आला होता.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZRVCL
Similar Posts
मायानगरी दुबईमधील ‘गोल्ड सुक’ अर्थात सुवर्णपेठ ‘संयुक्त अरब अमिराती’मधील दुबई हे साऱ्या जगाचेच एक मध्यवर्ती आकर्षणस्थान आहे. तेथील ‘बुर्ज खलिफा’पासून डेझर्ट टूरपर्यंत अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. तेथील एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे पर्यटकांना खेचून घेणारे महत्त्वाचे स्थान म्हणजे ‘गोल्ड सुक’ अर्थात सुवर्णबाजार. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर या वेळी लिहीत आहेत या ‘गोल्ड सुक’बद्दल
९१ वर्षांच्या ब्रिटिश आजी ठरल्या करोनाप्रतिबंधक लशीच्या जगातल्या पहिल्या लाभार्थी जग व्यापून टाकलेल्या करोनाला प्रतिकार करण्यासाठी लसी विकसित करण्याचे संशोधनकार्य अनेक देशांमध्ये सुरू असून, अनेक कंपन्या आणि सरकारी यंत्रणा त्यात कार्यरत आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये लसीच्या चाचण्या सुरू आहेत. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता ब्रिटनने सामान्य नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा आठ डिसेंबरला सुरू
... आणि न्यूझीलंड करोनामुक्त झाला! उद्यापासून व्यवहार पूर्ववत! वेलिंग्टन : सध्या जगभरात करोना कुठे किती वाढला, याच्याच बातम्या आहेत. त्यामुळे त्या बातम्यांकडे कितीही दुर्लक्ष करायचे म्हटले, तरी नकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. या पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडमधून एक अत्यंत सकारात्मक बातमी आली आहे. आजच्या घडीला न्यूझीलंडमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण नसल्याचे न्यूझीलंडच्या
जगभरातील भाषांमधील पुस्तकांचा संग्रह असणारी कतार नॅशनल लायब्ररी नुकतीच मी कतारमधील नॅशनल लायब्ररीला भेट दिली. जगभरातील विविध भाषांमधील ५० ते ६० हजारांहून पुस्तके येथे आहेत. आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language